सोलापुरात काँग्रेसच्या रियाज हुंडेकरी यांनी प्रभाग बदलला ! सोबत आले दादा
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक वर्ष सत्तेत राहिलेल्या काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. नुकतेच सोलापुरात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी महाविकास आघाडीची बैठक घेऊन महापालिका निवडणूक एकत्रित लढण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान काँग्रेसचे माजी स्थायी समिती सभापती रियाज हुंडेकरी यांनी आपला अठरा नंबर प्रभाग सोडून शेजारच्या एकवीस नंबर प्रभागात जाण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपला इच्छुक उमेदवारी अर्ज अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कडे दाखल केला. सोबतीला अनुसूचित जाती महिलेतून माजी नगरसेवक प्रवीण निकाळजे यांच्या कन्या प्रतीक्षा निकाळजे, सर्वसाधारण महिलेतून भीमाशंकर टेकाळे यांच्या सून किरण शीतलकुमार टेकाळे तर सर्वसाधारण जागेसाठी उद्धव ठाकरे शिवसेनेतून एक उमेदवार येणार असल्याचे सांगण्यात आले .
यापूर्वी 2017 च्या महापालिका निवडणुकीमध्ये रियाज हुंडेकरी हे प्रभाग 18 मधून चारच्या पॅनल मध्ये एकमेव निवडून आले होते बाकी उर्वरित तीन भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले. पण यावेळी मात्र निकाळजे यांनी प्रभाग बदलून ते आता शेजारच्या 21 नंबर मध्ये गेले आहेत.
प्रभाग 21 मध्ये रियाज हुंडेकरी, प्रवीण निकाळजे आणि भीमाशंकर टेकाळे हे एकत्र आल्याने पॅनल मजबूत झाल्याचे पाहायला मिळते. सर्वसाधारण जागेसाठी लिंगायत समाजातून उमेदवार आल्यास काँग्रेससाठी वातावरण चांगले राहील असे कार्यकर्त्यांमधून चर्चा आहे.





















