सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर कार पलटी होऊन अपघात ; महिला डॉक्टर वाचल्या
सोलापूर : जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या बाजूला रस्त्यावर डिव्हायडर न दिसल्याने एक कार थेट डिव्हायडर वर चढून पलटी झाली. मात्र सुदैवाने कार चालवणाऱ्या महिला डॉक्टर वाचल्या.
ही घटना आता काही वेळापूर्वी सव्वा सातच्या सुमारास घडली.
त्या महिले डॉक्टरचे नाव चडचणकर असल्याचे समोर आले आहे. एम एच १३ डी वाय २२५१ असे त्या कारचा क्रमांक आहे. या महिला डॉक्टर जिल्हा परिषदेच्या बाजूने पुढे रंगभवन चौकाकडे येत होत्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या गेटच्या काहीशी पुढे आल्यानंतर रस्त्यामध्ये डिव्हायडर त्यांना दिसले नाही. त्याच वेगात त्या डिव्हायडर वर चढून कार थेट पलटी झाली.
या कारचे मोठे नुकसान झाले आहे. पण सुदैवाने त्या चालक महिला डॉक्टर बचावल्या. घटना घडताच वाहतूक विस्कळीत होऊन मोठी गर्दी झाली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिक त्या महिलेच्या मदतीला धावले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोर रात्रीचा सुमारास विजेचे बोल नसल्याने अंधार असतो. त्यामुळे हे छोटे डिवाइडर अनेकांना दिसत नाही. तसेच सध्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या भिंतीला लागून फळ विक्रेते अतिक्रमण करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळेही वाहनांना जायला अडथळा होत असल्याचे चित्र आहे.