काँग्रेसमध्ये मोची समाजाची बंडखोरी ; करगुळे व भंडारे यांचे अर्ज दाखल
सोलापूर : सोलापुरात काँग्रेस पक्षातून बंडखोरी समोर आली आहे. शहर मध्य या मतदार संघात काँग्रेसच्या एक गठ्ठा मतदान असलेल्या मोची समाजातून माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे आणि पक्षाचे माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर खासदार प्रणिती शिंदे यांच्या रिक्त झालेल्या शहर मध्ये या मतदारसंघातून मोची समाजातून उमेदवारी मागण्यात आली होती समाजातील देवेंद्र भंडारे अंबादास करगुळे संजय हेमगड्डी या तिघांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली परंतु पक्षाने या तिघांपैकी एकाचा ही विचार केला नाही. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसचे उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे नाराज झालेल्या मोची समाजातील अपक्ष उमेदवारी अर्ज भरले आहेत.
माध्यमांशी बोलताना अंबादास करगुळे व देवेंद्र भंडारे यांनी उमेदवारी न दिल्याने नाराजी व्यक्त केली. प्रणिती शिंदे यांच्या तिन्ही विजयात सिंहाचा वाटा असलेल्या समाजाने उमेदवारी मागितली परंतु आमच्याकडे दुर्लक्ष केले गेले आमचा विचार झाला नाही त्यामुळे आम्ही बंडखोरी करत आहोत अशी माहिती दिली.