बाबांना राज्यातून फोन ; एमआयएमला आले टेन्शन ; परंतु ही यादी फेक ; काय घडले असे सोलापुरात
सोलापूर : विधानसभा निवडणूक जाहीर होऊन केवळ दोनच दिवस झाले आहेत. अद्यापही महाराष्ट्र राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडी यांचे उमेदवार जाहीर झाले नाहीत. उमेदवार पेक्षा कोण किती जागा लढवाव्यात हे सुद्धा निश्चित झाले नाही. असे असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास अचानक उमेदवार जाहीर झाल्याची यादी प्रसिद्ध झाली आणि त्यामुळे सोलापुरात प्रचंड गोंधळ उडाला.
ही यादी काँग्रेस पक्षाची होती. काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांचा सहीने एक उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली.
या यादीमध्ये 15 उमेदवार निश्चित करण्यात आले. त्यामध्ये सोलापूर शहर मध्य या मतदारसंघासाठी काँग्रेसचे बाबा मिस्त्री यांचे नाव तसेच सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी धर्मराज काडादी यांचे नाव या यादीमध्ये होते. ही यादी सोशल मीडियावर व्हायरल होताच बाबा मिस्त्री यांना संपूर्ण महाराष्ट्रातून फोन आले, अभिनंदन तुमची उमेदवारी जाहीर झाली म्हणून परंतु बाबा मिस्त्री यांनी मी शहर मध्य मधून इच्छुक नाही, माझे काम दक्षिण विधानसभा मतदारसंघात आहे.
त्या मतदारसंघात 2019 साली मी विधानसभा निवडणूक लढवली आणि तब्बल 56 हजार पेक्षा जास्त मते मी मिळवले आहेत. त्यामुळे ही यादी फेक आहे असे त्यांनी सांगितले.
यामुळे काँग्रेसच्या बाबा मिस्त्री यांची संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना काळात काम केल्यामुळे चांगली प्रतिमा निर्माण झाली त्यामुळेच हे फोन त्यांना आल्याचे सांगण्यात आले.
या यादीमध्ये बाबा मिस्त्री यांचे मध्य मधून नाव आल्याने एमआयएम पक्षाला टेन्शन आल्याचे दिसून आले पण ही यादी फेक असल्याचे समजताच त्यांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.