हगलूरच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत महिलांच्या लेझीमने वेधले लक्ष ; भव्य मिरवणुकीने जयंतीची सांगता
सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्तरित्या जयंती तालुका उत्तर सोलापूर हगलूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रम घेण्यात आले रक्तदान शिबिर होम मिनिस्टर, भीम गीताचा गायनाचा कार्यक्रम आणि कार्यक्रमाची सांगता भव्य अशा मिरवणुकीने झाली. यावेळी रक्तदान शिबिराचे उद्घाटन युवा नेते डॉक्टर पृथ्वीराज माने यांच्या हस्ते झाले तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन माजी आमदार दिलीप माने यांच्या हस्ते झाले.
यावेळी उत्तर सोलापूरच्या माजी सभापती रजनी भडकुंबे, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, मंडळाचे अध्यक्ष अभिजीत भडकुंबे, सरपंच संगीता बेर्डे बेळे, उपसरपंच प्रगती भडकुंबे, माजी सरपंच रफिक पठाण, माजी उपसरपंच विकास बनसोडे, लेझीम प्रमुख शशिकांत गायकवाड, एडवोकेट अविनाश बनसोडे, अमित भडकुंबे, किरण गायकवाड, बापू गायकवाड, जयवंत गायकवाड व मंडळाचे सर्व पदाधिकारी गावातील सर्व महिला पुरुष व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी अमरभीम तरुण मंडळ व एस बी ग्रुपच्या संयुक्त लेझीम पथकातील युवक युवतींनी लेझीमचे बहारदार खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली. विशेष करून फेटेधारी महिलांचा लेझिम सर्वांचे लक्ष वेधून घेणारा ठरला.
विवीध भीम गीते तसेच डॉल्बीच्या निनादात तरुणाई बेधुंद होऊन गेली होती. सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत चाललेल्या या मिरवणुकीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.