औरंगाबाद मध्ये सोमवारी मतदान ; प्रशासकीय यंत्रणा सज्ज ; जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केली पाहणी
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात होणाऱ्या छत्रपती संभाजी नगरात सोमवारी मतदान होत आहे. प्रशासकीय नाव जरी छत्रपती संभाजी नगर असले तरी निवडणुकीत अजूनही औरंगाबाद असेच नाव आहे. या निवडणुकीसाठी जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. ईव्हीएम मशीन, VVPAT मशीन सह साहित्य मतदान केंद्रावर पाठविण्यात आले आहे त्याची जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पाहणी केली. दरम्यान स्वामी यांनी अधिक माहिती दिली.
याठिकाणी एम आय एम चे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाच्या आखाड्यात पहिल्यांदाच दोन शिवसेना समोरासमोर आहेत. एक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, जो महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहे. तर दुसरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, जो महायुतीतील घटकपक्ष आहे. येथे महाविकास आघाडीकडून शिवसेनेने (ठाकरे गट) चंद्रकांत खैरे यांना, तर महायुतीकडून शिवसेनेने (शिंदे गट) पैठणचे आमदार संदिपान भुमरे यांना मैदानात उतरवले आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून अफसर खान हे चेहरेही मैदानात आहेत. तसेच, हर्षवर्धन जाधव यावेळीही अपक्ष म्हणून मैदानात आहेत. याशिवाय इतरही काही नेते या निवडणुकीत आपले नशीब आजमावत आहेत. मात्र मुख्य लढत शिवसेना VS शिवसेना VS एआयएमआयएम अशीच मानली जात आहे.