अकलूज मध्ये बॅनर फाडण्याची परंपरा ; जयकुमार गोरे नंतर रणजितसिंह निंबाळकर यांची बारी ; राम सातपुतेंकडून निषेध
अकलूज : भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आणि नेत्यांचे पोस्टर पाडण्याचे परंपरा अकलूज मध्ये कायम असल्याचे पाहायला मिळाले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेले बॅनर अकलूज मध्ये फाडण्यात आले.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनाचे डिजिटल बॅनर अकलूज मध्ये लावण्यात आले होते त्यावेळेसही काही अज्ञात इसमांनी ते बॅनर फाडले होते. हीच परंपरा पुन्हा काय म्हणायचे पाहायला मिळाले.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पोस्ट फाडल्यानंतर माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर या शब्दात निषेध नोंदवला आहे.
भाजपा नेते व माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे अकलूज मध्ये लागलेले बॅनर ज्या विकृतीने फाडले त्याचा निषेध.
अकलूज मधील जनतेवर जुलमी अत्याचार करणारी ही विकृती कोण आहे सर्वांना माहितच आहे.
माळशिरस तालुक्यातील भाजपा कार्यकर्ता तुमच्या दहशतीला भीक न घालता भाजपा संघटन वाढवत राहील.