कर्जमुक्ती योजनेतील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती ; 30 सप्टेंबर पर्यंत हि मुदत वाढवली
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण न केलेल्या ३३३५६ शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा दिनांक १२.०८.२०२४ ते १८.०९.२०२४ या कालावधीत उपलब्ध करुन देण्यात आली होती. या कालावधीत १८१६३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असुन अद्याप १५१९३ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण प्रलंबीत आहे. या शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची सुविधा दिनांक ३०.०९.२०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे.
जिल्हा उपनिबंधकांना सूचना करण्यात आल्या आहेत की, जिल्हयातील बँक शाखा, विकास संस्थांच्या सुचना फलकावर याबाबतची नोटीस प्रसिध्द करण्याबाबत संबंधीत बँक, विकास संस्थांना कळविण्यात यावे.
तसेच आधार प्रमाणीकरणाबाबत या कार्यालयामार्फत यापुर्वी दिलेल्या सुचनेप्रमाणे संबंधीत शेतकऱ्यांकडे दुरध्वनी, लघुसंदेश, गटसचिव, संस्थासचिव, बैंक मित्र, सखी यांचेमार्फत संपर्क करुन संबंधीत शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणासाठी प्रोत्साहीत करण्याची कार्यवाही यापुढे सुरु ठेवावी.
राज्यस्तरीय बैंकर्स समिती यांना विनंती करण्यात येते की, सदर वाढीव मुदतीबाबत सदस्य व्यापारी बँकांना अवगत करुन आवश्यक कार्यवाहीच्या सुचना निर्गमीत कराव्यात.