भाजपचे बनशेट्टी परिवार व सुरेश पाटील यांच्यात दिलजमाई ; काँग्रेसच्या अशोक निंबर्गी यांची मध्यस्थी
सोलापूर आणि शहर उत्तर या मतदारसंघातील राजकारणाला कलाटणी देणारी आणि दुरावलेल्या दोन परीवारां जवळ आणणारी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे.
मागच्या पाच वर्षापूर्वी स्वतःवर विष बाधा झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी शोभा बनशेट्टी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले होते, एवढ्या वर्षानंतर सुरेश पाटील हे मंगळवार दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी आले. याठिकाणी काँग्रेस नेते अशोक निंबर्गी, भाजप एस सी मोर्चा अशोक खटके, श्रीशैल बनशेट्टी, शशी थोरात, अक्षय अंजीखाने, सागर आतनुरे हे उपस्थित होते.
शोभा बनशेट्टी या आल्यानंतर सुरेश पाटील हे लगेच पायाजवळ झुकले. त्यानंतर बनशेट्टी डोळ्यात अश्रू आले होते. पाटील यांनी घडलेल्या घटनेची माहिती देताना दिलगिरी व्यक्त करीत निश्चितच बनशेट्टी परिवार मला माफ करेल अशी भावना व्यक्त केली.
शोभा बनशेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना मी अण्णांना कधीच माफ केलंय असे सांगत भाऊ माझ्या घरी आला मला आनंद आहे, दोन मित्र पुन्हा मिळाले त्यांनी यापुढे सारथी म्हणून माझ्या सोबत राहावे असे आवाहन केले.