“पालकमंत्री असावा तर असा” ; जया भाऊ पहाटेच ‘ऑल फील्ड’वर नागरिकांच्या दारोदारी जाऊन दिला दिलासा
सोलापुरात गुरुवारी पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण सोलापुरात हाहाकार उडाला. सखल आणि झोपडपट्टी भागात घरात पाणी शिरल्याने नागरिकांना अख्खी रात्र जागून काढा लागली. तुळजापूर रोड, होडगी रोड, अक्कलकोट रोड वरील ओढ्यांना पूर आल्याने रस्ते बंद होते.
सोलापूर शहरात अनेक भागांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. विशेष करून घरकुल परिसरात नागरिकांचे पावसामुळे मोठे हाल झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे गुरुवारी मुक्कामी होते. त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन शुक्रवारी पहाटे सहा पासूनच त्यांनी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांच्यासोबत संपूर्ण शहरात पाहणी केल्याचे दिसून आले. नागरिकांशी संवाद साधला त्यांना दिलासा दिला.
बेडर पूल, मोची गल्ली, लोधी गल्ली, अशोक चौक परिसर, घरकुल, शेळगी भागात जाऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना समस्या ऐकून घेतल्या.
माध्यमांशी बोलताना सोलापूर शहरात कचरा, ड्रेनेज, नालेसफाईचा प्रश्न तसेच सार्वजनिक शौचालयाचा विषय गंभीर असल्याचे सांगत यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि त्यासाठी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन सूचना करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.























