पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांचे मुख्यमंत्र्यांनी केले विशेष कौतुक ; पहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर मुंबई विमान सेवेचा प्रारंभ झाला. यावेळी व्यासपीठावर देशाचे नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार सुभाष देशमुख, आमदार विजय देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, माजी आमदार दिलीप माने , सुरेश हसापुरे, शहाजी पवार, मनीष देशमुख, अमोल शिंदे यांच्यासह प्रशासकीय, राजकीय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुरा पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले पण या संकटाशी लढताना लढताना जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व त्यांच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत घेतली आहे, त्यांचे मी विशेष अभिनंदन करेन. कर्मचाऱ्यांची तसेच NDRF ची मदत घेऊन प्रत्येकाला पुरातून सुखरूप बाहेर काढले.