सोलापूरचे इंद्रभवन ते आता थेट दिल्लीच्या संसदचे वेध ; श्रीदेवी फूलारे आता लोकसभेसाठी इच्छुक
सोलापूर : दहा वर्ष महापालिका गाजवणाऱ्या काँग्रेसच्या माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे आता थेट मोठी झेप घेण्यास तयार असून त्या लोकसभा लढवण्यासाठी इच्छूक असल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेल्या जाहिरातीवरून हे स्पष्ट होत आहे.
पाच फेब्रुवारी माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा वाढदिवस त्यांचे पती जॉन फुलारे हे वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करतात. यंदाच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी दिलेल्या प्रत्येक जाहिरातीमध्ये लोकसभेचे चित्र दिसून येते, तसेच या पोस्टर मध्ये भाजपचा झेंडा यामध्ये भगवा आणि हिरवा रंग आहे तसाच रंग या जाहिरातींमध्ये असल्याने त्या भाजपकडून इच्छुक आहेत का? असाही प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यंदा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे तशी तयारी सुद्धा त्या करीत आहेत. दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा अजून उमेदवार निश्चित झालेला नाही परंतु सोलापुरातून स्थानिक अनेक नेत्यांनी भाजपकडे इच्छा व्यक्त केली आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने आणि श्रीदेवी फुलारे या चर्मकार समाजाच्या असल्याने त्यांनीही लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारीची मागणी केल्याची खात्रीशीर माहिती आहे.
मागील दहा वर्षांमध्ये महानगरपालिकेमध्ये कामकाज करताना सोलापुरात सर्वांचेच लक्ष फुलारे यांनी वेधून घेतले असून अनेक विकास कामे त्यांनी केली. मुस्लिम समाजाच्या मोदी स्मशानभूमीचा कायापालट त्यांनी केला, महापालिकेतील आजपर्यंत अनेक पदे भरलेल्या मुस्लिम समाजाच्या नेत्यांना जमले नाही ते चर्मकार समाजाच्या फुलारे यांनी करून दाखवले. त्याच्या शेजारी असलेल्या ख्रिश्चन स्मशानभूमित अनेक सुधारणा केल्या. कुमार चौकात पावसाळ्यात तलावाचे स्वरूप यायचे त्या ठिकाणीही पुढाकार घेऊन त्या पाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. डफरिन हॉस्पिटलमध्येही आपल्या विकास निधीतून सोयी सुविधा पुरवल्या. आपल्या भागात रस्ते ड्रेनेज असे अनेक प्रश्न सोडवले. सर्व समाजाच्या कार्यक्रमात त्या सहभागी होतात.
एकूणच त्यांनी केलेल्या यंदाच्या जाहिरातीवरून त्या निश्चितच लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे सिद्ध होते. त्यांचा महापालिकेतील परफॉर्मन्स, दहा वर्षाची राजकीय वाटचाल पाहता सोलापुरात त्यांना ओळखणारा असा कोणीही नाही. त्यांना गोल्डन नगरसेविका म्हणून ही ओळखले जाते. सोलापूरचे इंद्रभवन ते आता थेट दिल्लीची संसद अशी झेप घेण्याच्या तयारीत त्या दिसत आहेत.