अजित पवार आमचे 7000 कोटी परत करा, अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा
सोलापूर : बहुजन समाज पार्टीच्या वतीने समाज कल्याण खात्याचा ७ हजार कोटी रुपयांचा निधी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवारांनी इतरत्र वळविल्याच्या निषेधार्थ त्यांच्यावर राज्य शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी जातीवादी अजित पवारांचा धिक्कार असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निषेध असो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निषेध असो, अजित पवारांचा निषेध असो, राज्य सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला व समाज कल्याणचा ७ हजार कोटी रूपयाचा निधी समाज कल्याण खात्याकडे राज्य सरकारने परत करावा तसे नाही केल्यास बहुजन समाज पार्टी तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिला.
हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड संजीव सदाफुले आप्पासाहेब लोकरे यांच्या प्रमुख उपस्थित व जिल्हाध्यक्ष बबलू गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आले
यावेळी सोलापूर शहराध्यक्ष देवा उघडे, जिल्हा प्रभारी भालचंद्र कांबळे, जिल्हा महासचिव दीपक ताकतोडे, जिल्हा कार्यालय सचिव शीलवंत काळे, शहर युवक अध्यक्ष अमर साळवे, सुहास सुरवसे, श्रीकृष्ण प्रेक्षाळे, ॲड महादेव कदम, नितीन गायकवाड, आकाश इंगळे, प्रवीण कांबळे, महेंद्र कांबळे, संजय गायकवाड, इंद्रजीत वाघमारे, रोहन बनसोडे, मिनाज शेख, प्रतीक बुवा लोकरे, अविनाश निकंबे, अतिश वाघमारे, सचिन तुळशे व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.