नितेश राणेंवर एमआयएमचे फारूक शाब्दी भडकले ; आमच्या बॉसचा मार बसला तर आवाज देखील निघणार नाही
सोलापूर : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. संभाजी नगर जिल्ह्यातील एका खाजगी बॅंकेच्या ठेवीदारांना सोबत घेऊन खा.इम्तियाज जलील आंदोलन करत होते. पोलीस प्रशासनाने खा.इम्तियाज जलील यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्याविरुद्ध सोलापुरातील एमआयएमने फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखालील निषेध केला. दंडाला काळ्या फिती लावून सोलापूर एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला. पोलिसांनी जी दंडेलशाही केली,त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शाब्दी यांनी केली आहे. फारूक शाब्दी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
नितेश राणेंवर एमआयएमचे फारूक शाब्दी भडकले ; आमच्या बॉसचा मार बसला तर आवाज देखील निघणार नाही
आगामी निवडणूका डोळ्या समोर ठेवून काही जातीयवादी पक्ष जातीचे राजकारण करत आहेत.भाजप आमदार नितेश राणे यांनी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथे जाहीर सभेत चिथावणीखोर भाषण केले. तसेच काळजी करू नका आपला बॉस सागर बंगल्यावर आहे. भाजप आमदार नितेश राणेंच्या भाषणाचा सर्वच स्तरातून निषेध केला जात आहे. सोलापूर जिल्ह्याचे एमआयएम शहर व जिल्हा प्रमुख फारूक शाब्दी यांनी नितेश राणेंचा तीव्र शब्दांत विरोध केला.तुमचा बॉस सागर बंगल्यावर आहे तर आमचा बॉस वर आकाशात आहे, आमच्या बॉसचा मार नितेश राणें यांना बसला तर आवाज देखील निघणार नाही अशा शब्दांत फारूक शाब्दी यांनी राणेंचा खरपूस समाचार घेतला.
हे पण वाचा : तुम्हारा जमीर मर गया है क्या?
अक्कलकोट मध्ये शांतता ठेवा फारूक शाब्दी यांचे आवाहन
अक्कलकोट शहरात अज्ञात कारणावरून दोन गटात हाणामारी सारखा प्रकार घडला आहे.पोलीस प्रशासन योग्य ती कारवाई करत आहेत.मात्र काही संघटनानी मारहाणीच्या निषेधार्थ अक्कलकोट बंदची हाक दिली आहे.एमआयएमचे सोलापूर प्रमुख फारूक शाब्दी यांनी सर्व समाजातील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. पोलीस प्रशासन योग्य ती कडक कारवाई करत आहेत.असे फारूक शाब्दी यांनी जातीय तेढ होऊ नये यासाठी प्रयत्न केला. यावेळी फारूक शाब्दी सोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.