फारूक शाब्दिच सगळीकडे ; मुस्लिम समाजात क्रेझ कायम, या पक्षांनी लावले बॅनर वर फोटो
सोलापुरात फारूक शाब्दी यांचा प्रभाव आजही कायम आहे. AIMIM, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या बॅनरवर सर्वत्र फारूक शाब्दी यांचीच छायाचित्रे दिसून येत आहेत. अंतर्गत गटबाजीमुळे फारूक शाब्दी यांनी AIMIM पक्षाचा राजीनामा दिला असला, तरी कोणावरही आरोप न करता त्यांनी शांतपणे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.
२०१९ साली फारूक शाब्दी यांनी सोलापुरात पाऊल टाकल्यानंतर त्यांच्या समर्थकांचा मोठा वर्ग निर्माण झाला. हेही तितकेच खरे आहे की शाब्दी यांच्या राजीनाम्यानंतर त्यांना मानणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनीही पक्ष सोडला. शाब्दी केवळ AIMIM पर्यंत मर्यादित राहिले नसून, AIMIM सोबतच राष्ट्रवादी (अजित पवार गट), समाजवादी पक्ष आणि आम आदमी पार्टीतही त्यांची जबरदस्त लोकप्रियता आहे.
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रत्येक पक्षाला फारूक शाब्दी यांची गरज भासत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
AIMIM पक्षाची संघटना बळकट करताना शाब्दी यांनी पक्षाला सुवर्णकाळ दाखवला. २०१९ आणि २०२४ च्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी दुसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक मते मिळवून विक्रम प्रस्थापित केला.
२०१९ मध्ये भाजपाची प्रचंड लाट असतानाही शाब्दी यांच्यासमोर भाजपचा उमेदवार उभा राहण्याच्या स्थितीतही नव्हता. सोलापूर आणि मुंबई—या दोन्ही जिल्ह्यांची जबाबदारी शाब्दी यांनी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली. मात्र महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर एक वेगळीच राजकीय चित्रस्थिती समोर आली.
सोलापूर आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्ये AIMIM पक्षाला नुकसान होऊ नये व पक्षाला मोठा धक्का बसू नये, याच उद्देशाने फारूक शाब्दी यांनी २७ डिसेंबर २०२५ रोजी सोलापुरात राजीनामा दिला. AIMIM चे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या सभेत केवळ “फारूक शाब्दी” या नावाचीच गूंज ऐकू येत होती. सभेदरम्यान AIMIM चे माजी नगरसेवक गाजी जहागीरदार भावुक झाले आणि आपले अश्रू आवरू शकले नाहीत.






















