सोलापूर : सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी एमआयएमचे सोलापूर प्रमुख हाजी फारूक शाब्दी यांच्या नेतृत्वाखाली एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे.शनिवारी सायंकाळी किडवाई चौक येथील केएमसी गार्डन या ठिकाणी उदघाटन समारंभ संपन्न झाला.
हाजी फारूक शाब्दी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले.गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ही ट्रस्ट सोलापूर शहरात आणि जिल्ह्यात कार्य करणार आहे.सर्वच समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना,अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. शैक्षणिक आयुष्य जगताना,आर्थिक ,सामाजिक सर्व समस्या सोडवण्यासाठी शाब्दी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट काम करणार असल्याची माहिती शाब्दी यांनी दिली.
विद्यार्थ्यांच्या पुढाकाराने हाजी फारूक शाब्दी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टची स्थापना करण्यात आली.उद्घाटन प्रसंगी सोलापुरातील शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष,प्राध्यापक,आणि शिक्षक उपस्थित होते.हाजी फारूक शाब्दी यांच्या हस्ते उदघाटन समारंभ संपन्न झाले. विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत सामाजिक ट्रस्टची स्थापना केली असल्याची माहिती फारूक शाब्दी यांनी दिली. सद्यस्थितीत आजही झोपडपट्टी भागात अनेक विद्यार्थी व विद्यार्थीनी हे फक्त आर्थिक समस्यामुळे शिक्षणापासून वंचित राहतात. शिक्षण हा सर्वच विद्यार्थ्यांचा मूलभूत हक्क आहे.शासनाने प्राथमिक शिक्षण मोफत केले आहे तरी देखील विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करताना कसरत करावी लागते.विद्यार्थी व विद्यार्थीनीना योग्य मार्गदर्शन आणि योग्य शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट काम करणार असल्याची माहिती शाब्दी यांनी दिली.
यावेळी इसाक मुजावर, निजामोद्दीन शेख, नुरअहमद बशिर कारंजे, ट्रस्टचे अध्यक्ष मुजम्मील वड्डो, कार्याध्यक्ष मुसद्दीक शेख, सेक्रेटरी उसामा टंगसल, उमर बेगमपुरे तसेच माजी नगरसेवक गाझी जहागीरदार, माजी नगरसेवक वाहेदा भंडाले, माजी नगरसेवक अझहर हुंडेकरी, राजा बागवान, अशपाक बागवान, अवैस शेख, साहील रामपुरे, इलियास शेख, नासिर मंगलगीरी, सरफराज शेक, सलमा सय्यद, शोहेब चौधरी, अनिसा मोगल, इक्बाल पठान, विक्रम वाडे, मचिंद्र लोकेकर अनिसा डोका, नसिमा कुरेशी व ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.