एप्रिल पूर्वी पाणी द्या ; कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांच्या सूचना ; जलजीवनच्या कामाची पाहणी
सोलापूर : केंद्र सरकारचे अतिशय महत्त्वकांक्षी योजना असलेल्या जल जीवन मिशनच्या कामांची पाहणी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांनी केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव या ठिकाणी जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या आणि अंतिम टप्प्यात आलेल्या कामाची पाहणी करताना धनशेट्टी यांनी विभागाला सूचना केल्या.
कासेगाव या ठिकाणी बिरोबा वस्ती येथे जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पाहणी वेळी सरपंच यशपाल वाडकर, उपाभियंता कुलकर्णी, ग्रामपंचायत सदस्य शेख, माझे सदस्य वाडकर, मक्तेदार, ग्रामस्थ उपस्थित होते.
सुमारे दीड कोटीचे हे काम असून हे काम झाल्यानंतर संपूर्ण गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे. यावेळी पाहणी करताना धनशेट्टी यांनी कामासाठी वाढीव निधी लागणार असेल तर मागणी करा आणि एप्रिल पासून ग्रामस्थांना पाणीपुरवठा झाला पाहिजे अशा सूचना केल्या.