एक गायकवाड रणांगणातून पळाला आमचा गायकवाड आहेच की
सोलापूर : सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राहुल गायकवाड यांनी अचानकपणे माघार घेतली विशेष म्हणजे पक्षाच्या वरिष्ठांना याबाबत कोणतीही माहिती नव्हती सोमवारी दुपारी राहुल गायकवाड हे आपल्या चार सहकाऱ्यांसोबत आले आणि त्यांनी आपला अर्ज माघार घेतला या राजकीय घडामोडीने संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्राचे विभागीय निरीक्षक आप्पासाहेब लोकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना आवाहन केले आहे. ते म्हणाले, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने सोलापूर लोकसभेच्या मैदानातून माघार घेतली मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी प्रकाश आंबेडकर हे स्वतः सोलापुरातून उमेदवार असल्याने बहुजन समाज पार्टीच्या उमेदवाराने माघार घेतली होती, आता तुम्ही आम्हाला सोलापुरातून पाठिंबा द्यावा असे आवाहन केले.