डॉ. एम. के. पाटील यांचा एन.पी.टी.ई.ल. तर्फे विशेष सन्मान
केंद्र सरकार तर्फे राबविण्यात आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमामध्ये ऑनलाईन (मुक्स) कोर्सेसचा समावेश करणे बंधनकारक आहे.केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयातर्फे स्वयंम प्लॅटफॉर्म द्वारे हे ऑनलाईन (मुक्स) कोर्सेस राबविले जातात.
देशातील सात आय.आय.टी इन्स्टिट्यूटने एकत्र येऊन एन.पी.टी.ई.ल हा प्रोजेक्ट स्वयं प्लॅटफॉर्म द्वारे राबविला आहे. स्वयम -एन.पी.टी.ई.ल द्वारे देशभरातील महाविद्यालयांना लोकल चाप्टर दिले जाते. देशातील काही महाविद्यालयांना हे लोकल चाप्टर मिळाले आहे. त्यात भारती विद्यापीठ अंतर्गत अभिजीत कदम इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड सोशल सायन्स सोलापूरचा समावेश आहे. सर या लोकल चाप्टरचे सोलापुरात समन्वयक असून त्यानी इन्स्टिट्यूट मध्ये ऑनलाईन कोर्सेस सातत्यपूर्ण व प्रभावीपणे राबविल्यामुळे डॉ. एम. के. पाटील यांचा गौरव पत्र देऊन स्वयम -एन.पी.टी.ई.ल द्वारे विशेष सन्मान करण्यात आला.
त्यांच्या या यशाबद्दल इन्स्टिट्यूट चे संचालक प्रा. डॉ. एस. बी. सावंत यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ. पी. पी. कोठारी, एम.बी.ए. विभाग प्रमुख प्रा. सी.आर. सूर्यवंशी ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.