डोणगाव इथल्या प्रशालेतील बोगस भरतीची चौकशी करा ; सारिका वाघमारे यांची मागणी
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव इथल्या आमले प्रशालेत झालेल्या बोगस लिपिक भरतीची चौकशी करण्याची मागणी डोणगाव येथील रहिवासी सारिका वाघमारे यांनी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडे केली आहे.
या प्रशालेमध्ये शिक्षक आणि लिपिक भरतीची जाहिरात निघाली होती. बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशालेत 50 टक्के शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हे महिला घेण्याचे धोरण ठरले असले मुळे सारिका वाघमारे यांनी मोठ्या अपेक्षेने लिपिक या पदासाठी अर्ज केला. त्यांना मुलाखतीलाही बोलवण्यात आले. परंतु ती मुलाखत नावाला होती संबंधित लिपिक पदासाठी मोठी आर्थिक देवाणघेवाण करून ते पद भरण्यात आल्याचा वाघमारे यांना संशय आला.
त्यामुळे या भरती प्रक्रियेची आणि संबंधित संस्थेचे उपाध्यक्ष यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी शिक्षणाधिकाऱ्यांकडे केल्याचे वाघमारे यांनी सांगितले.