“कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र” ; काँग्रेस सोडल्यानंतर काय अवस्था झाली रे बाबा !
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान सोलापुरात अनेक राजकीय समीकरणे बदलली विशेष करून मुस्लिम समाजामध्ये शहर मध्य या मतदारसंघात उमेदवारी मागणीचा जोर पाहायला मिळाला परंतु काँग्रेसकडून निराशा झाल्यानंतर अनेकांनी एमआयएम या पक्षामध्ये जाणे पसंद केले.
त्यामध्ये काँग्रेस नेते शौकत पठाण, माजी नगरसेवक तौफिक हत्तुरे या प्रमुख नेत्यांचा समावेश होता. शौकत पठाण जरी एमआयएम मध्ये असले तरी त्यांच्या हुकमी एक्का म्हणला जाणाऱ्या माजी नगरसेविका फिरदोस पटेल या अजूनही काँग्रेसमध्येच आहेत.
जेव्हा मोठे नेते पक्ष येतात तेव्हा निश्चितच त्यांना कोणते तरी पद द्यावे लागते. काही दिवसांपूर्वीच शहराचे अध्यक्ष फारुख शाब्दी यांनी शहराची कार्यकारिणी जाहीर केली. त्यामध्ये शौकत पठाण यांचे नाव कुठेही नव्हते परंतु कार्यकारणी जाहीर करण्यापूर्वी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांचा सोलापूर दौरा झाला. त्यांच्या एका भाषणामध्ये त्यांनी सोलापूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून शौकत पठाण यांच्या नावाची घोषणा केली होती असे शौकत पठाण सांगतात.
तेव्हापासून पठाण हे स्वतःला जिल्हाध्यक्ष मानत आहेत परंतु आजपर्यंत एखादे मोठे पद द्यायचे असेल तर तसे अधिकृत पत्र दिले जाते किंवा काढले जाते असे एमआयएम या पक्षात कुठेही घडले नाही. शौकत पठाण हे स्वतःला जिल्हाध्यक्ष म्हणत आहेत पण सध्या त्यांच्यावर स्वघोषित जिल्हाध्यक्ष अशी टीका होताना दिसत आहे.
फारूक शाब्दि हे सोलापूर शहराच्या अध्यक्षपदासह त्यांनी मुंबई प्रदेशचे अध्यक्ष पद घेतले आहे त्यामुळे तर शौकत पठाण यांची अपेक्षा वाढली आहे. शाब्दि यांच्याकडून कोणतेही पत्र पठाण यांना देण्यात आले नाही.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासोबत शौकत पठाण यांनी फोनवर बोलताना शाब्दि हे जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र अजूनही देत नाहीत त्यामुळे माझ्यावर स्वघोषित जिल्हाध्यक्ष अशी टीका होत आहे असे सांगितल्यावर जलील यांनी मी स्वतः तुमची एका भाषणात जिल्हाध्यक्ष म्हणून घोषणा केली आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका.
काँग्रेस पक्षामध्ये असताना पठाण यांची क्रेझ वेगळी होती पण आता एमआयएम या पक्षामध्ये आल्यावर त्यांची चांगलीच गोची होताना पाहायला मिळत आहे. कुणी जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र देता का पत्र अशी खिल्ली आता राजकीय वर्तुळात त्यांची उडवली जात असल्याचे पाहायला मिळत आहे.