जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दुपारी केले मतदान ; रांगेत थांबलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरिकांनी दिला हा सन्मान
सोलापूर : सोलापूर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सकाळ ऐवजी दुपारी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. शहरातील सिध्देश्वर प्रशालेत दुपारी चार वाजता त्यांनी मतदान केले.
सिध्देश्वर प्रशालेत मतदानाला नागरिकांची रांग लागली होती. सिद्धेश्वर प्रशालेच्या मतदान केंद्रावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे साधारणतः चार वाजता मतदानासाठी गेले. त्या मतदान केंद्रावरील मतदाराच्या रांगेमध्ये मतदानाचा हक्क बजावण्यासाठी उभा राहिले. परंतु या मतदार केंद्राच्या रांगेतील सर्व मतदारांनी जिल्हाधिकारी आशीर्वाद यांना आपण अगोदर मतदान करण्याची विनंती केली. प्रथमतः जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी तसे करण्यास नकार दिला, परंतु मतदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.