सोलापूर झेडपीत दलित वस्तीच्या टक्केवारीची चर्चा ; त्या कर्मचाऱ्यावर प्रशासन मेहेरबान का?
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला दोन महिन्यात आता तिसरा प्रभारी समाज कल्याण अधिकारी मिळाला आहे. माध्यमिक शिक्षण विभागाप्रमाणे या पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ पाहायला मिळत आहे.
दरम्यान आता येत्या तीन महिन्यांत पुन्हा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने निधी खर्चाची लगबग चालू आहे. समाज कल्याण विभागातील दलित वस्तीच्या टेबलची कायम चर्चा असते, ते कामे मिळावीत म्हणून राजकीय नेते, कॉन्ट्रॅक्टर हे अधिकारी यांच्या मागे पुढे पहायला मिळतात.
दलित वस्तीच्या टक्केवारीची जिल्हा परिषदेत जोरदार चर्चा ऐकण्यास मिळते. तीन टक्के घेतल्या शिवाय प्रशासकीय मान्यता दिली जात नाही असा आरोप नुकत्याच झालेल्या खासदारांच्या बैठकीत करण्यात आल्याचे समजते. या टेबलला असलेल्या कर्मचाऱ्यावर प्रशासन इतके मेहेरबान का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
संबंधित कर्मचारी ही आपल्या कार्यालयात कमी अन् बाहेर कॅन्टीन वर जास्त पाहायला मिळते, त्यांच्यासोबत कायम नागरिकांचा घोळका असतो, दोन वर्षापूर्वी तर यशवंत नगर मधील मुलींच्या वसतिगृहात प्रमा वाटत असताना एका चॅनलने शूटिंग केले होते, कॅमेरा पाहताच तिथून सर्वांनी पोबारा केला होता. नंतर चौकात प्रमा वाटताना संबंधित कर्मचारी दिसून आली होती. वारंवार असे प्रकार पाहायला मिळतात.
त्या कर्मचाऱ्याचा टेबल बदलणार असल्याच्या चर्चाही ऐकण्यास मिळतात, पण तसे होत नाही, परंतु त्या कर्मचाऱ्याला प्रशासनाकडून समज का दिली जात नाही हा संशोधनाचा विषय आहे. समाज कल्याण मध्ये आहेत ‘शशी’ कपूर व देवा’नंद’ भ्रष्टाचाराचे मास्टर माईंड वाचा लवकरच……