जुबेर बागवान यांनी महेश कोठेंची भेट घेतल्याची चर्चा ; संतोष पवार जुबेर बागवान जोडगोळी तुटणार?
सोलापूर : मंगळवारी सोलापूरच्या राजकीय वर्तुळात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी एकदा का एक अशी बातमी सर्वच माध्यमांमध्ये आली शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांची पक्षात घुसमट होत असल्याने ते लवकरच पदाचा राजीनामा देणार असल्याचे खात्रीशीर वृत्त पुढे आले.
पक्षांतर्गत सुरू असलेली गटबाजी, नव्याने दोन कार्याध्यक्ष नियुक्ती होत असल्याच्या माहितीमुळे अजित पवारांचे कट्टर समर्थक शहराचे कार्याध्यक्ष जुबेर बागवान हे राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे शहराचे अध्यक्ष संतोष पवार व कार्याध्यक्ष जुबेर बागवान ही जोडगोळी आता तुटण्याच्या मार्गावर असून या दोन नेत्यांनी सोलापुरात सामाजिक समतेचा संदेश दिला आहे. जुबेर बागवान यांनी जर राष्ट्रवादी काँग्रेस सोडला तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जाईल.
याच पार्श्वभूमीवर जुबेर बागवान यांनी शरदचंद्र पवार गटाचे माजी महापौर महेश कोठे यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. गुरुवारी दुपारी जुबेर बागवान यांच्या बातम्या लागल्यानंतर सायंकाळ नंतर ते कुणाच्याही संपर्कात नव्हते त्यांचा फोनही स्विच ऑफ होता.
या प्रकरणी महेश कोठे यांच्याशी चर्चा केली असता, मुळात जुबेर बागवान यांनी शरद पवार यांच्या सोबत राहायला हवे होते, त्यांना अपेक्षित पद आम्ही दिले असते, त्यांचा योग्य सन्मान झाला असता जर आले तर ते आमचे लहान बंधू आहेत स्वागतच करू.