होनसळ येथील दिलीपराव माने प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष संभाजी भडकुंबे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती व संस्थेचे संचालिका रजनी भडकुंबे होत्या.
संभाजी भडकुंबे यांनी जीवनात खेळाचे महत्व याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. कार्यक्रम प्रसंगी विकास सोसायटीचे चेअरमन सुखदेव पवार, प्रगती भडकुंबे, पाटलोजी जानराव, बजरंग मस्के, श्रीमंत माने उपस्थित होते.
या क्रीडा सप्ताहमध्ये मध्ये खो-खो, कबड्डी, क्रिकेट, हॉलीबॉल, बुद्धिबळ, गोळा फेक, लंगडी आदी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रीडा प्रमुख धर्मदेव शिंदे, अशपाक अत्तार, मुख्याध्यापक राजेंद्र मोहोळकर, उमेश जगताप, सचिन नाईकनवरे, अख्तर सय्यद, विनोद राऊत, सुधाकर पवार, तात्यासाहेब तांबे, जरीना सय्यद, शशिकांत गायकवाड सर्व शिक्षक वृंद क्रीडा स्पर्धा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तात्यासाहेब तांबे तर सूत्रसंचालन सुधाकर पवार यांनी केले. शेवटी आभार अशपाक आत्तार यांनी मान.