Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

Dhangar Reservation | संयमी राधाकृष्ण विखे पाटील : त्यांनी पोलिसांना अटक करण्याचे कोणतेही आदेश दिले नाहीत, पोलिसांनी आपले काम केले

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 September 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सोलापूर : धनगर समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी सोलापुरात जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर धनगर आरक्षण कृती समितीचे शेखर बंगाळे यांनी भंडारा उधळून लक्ष वेधले. याच ठिकाणी उपस्थित असलेले भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनीही चिडून बंगाळे यांना मारहाण केली नंतर पोलिसांनी बंगाळे यांना ताब्यात घेतले.


या घटनेनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे परंतु नेमके काय घडले हे मात्र पाहणे गरजेचे आहे.


शुक्रवार सकाळी सव्वा दहाच्या सुमारास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपले काही सहकारी ज्यामध्ये प्रदेश सरचिटणीस शहाजी पवार, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण यांच्यासह जिल्ह्याच्या काही प्रमुख अधिकाऱ्यांसोबत शासकीय विश्रामगृहावर चर्चा करत होते. 


याचवेळी धनगर आरक्षण कृती समितीचे शेखर बंगाळे शासकीय विश्रामगृहात आले. त्यांनी कपाळाला भंडारा लावला होता, गळ्यात पिवळा शेला घातला होता  बंगाळे वादग्रस्त असल्याने पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारात अडवले. पण बंगाळे यांनी आपणाला पालकमंत्र्यांना निवेदन द्यायचे आहे असे वारंवार पोलिसांना सांगितले. जेव्हा ही माहिती आतमध्ये असलेले शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना समजली तेव्हा त्यांनी पोलिसांना आत सोडण्यास सांगितले. त्यामुळे पोलिसांनी बंगाळे व त्यांच्या सहकार्याला आत सोडले. स्वतः काळे यांनी आपल्या समाजाचा माणूस आहे आणि धनगर समाजाचे आरक्षण हा महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे म्हणून स्वतः त्याला हाताला धरून पालकमंत्र्याजवळ नेले आणि निवेदन घ्यावे अशी विनंती केली.


पण बंगाळे यांनी हीच संधी साधून खिशातून भंडाऱ्याची पुडी काढून पालकमंत्र्यांच्या डोक्यावर ओतली, पालकमंत्र्यांच्या डोळ्यावर चष्मा असल्याने त्यांच्या डोळ्याला कोणतीही इजा झाली नाही याच वेळेस बंगाळे यांनी विश्वासघात केला हे लक्षात आल्यानंतर नरेंद्र काळे चिडले. काळे यांच्यासह तिथे उपस्थित पोलिसांनी सुद्धा बंगाळे यांना धरून मारहाण केली. यावेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोडा त्याला अशा सूचना पोलिसांना दिल्या. तसेच शहाजी पवार यांनीही अरे त्यांना अटक करू नका सोडून द्या असे पोलिसांना म्हणाले. परंतु कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याने पोलिसांनी आपली जबाबदारी पार पडताना शेखर बंगाळे याला ताब्यात घेतले. नरेंद्र काळे यांच्या जागेवर दुसरा कुणी असता तर तेच केले असते असे चित्र यावेळी दिसून आले.


सकाळी अकरा वाजता सोलापूर जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण हुतात्मा स्मृती मंदिरात होते. या घटनेनंतर पालकमंत्री येणार की नाही? अशा टेन्शनमध्ये जिल्हा परिषदेचे प्रशासन दिसून आले. परंतु संयमी आणि प्रचंड मोठा राजकीय अनुभव असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावली झेडपी प्रशासन कार्यक्रम लवकरात लवकर आटोपण्याचा तयारीत होते. पण अर्धा तासापूर्वी घडलेल्या घटनेचे कोणतेही टेन्शन त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले नाही. तब्बल सव्वा तास पालकमंत्री या कार्यक्रमाला थांबले. 20 मिनिटं उपस्थिताना मार्गदर्शन केले.  हा मोठेपणा पालकमंत्र्यांनी दाखवला.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण थाटात ; पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी जिल्हा परिषदेला केल्या या सूचना

Next Post

पालकमंत्री सत्कारापेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेने दिलेल्या या भेटवस्तूने अधिक भारावले…! काय होती ती भेटवस्तू

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

पालकमंत्री सत्कारापेक्षा सोलापूर जिल्हा परिषदेने दिलेल्या या भेटवस्तूने अधिक भारावले...! काय होती ती भेटवस्तू

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973467
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group