Tuesday, March 31, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

आम्हाला हवाय देवेंद्र भाऊच ! ४८ मतदारसंघात १२५ सभा, महाराष्ट्रात फडणवीसांचाच बोलबाला?

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 April 2024
in political
0
आम्हाला हवाय देवेंद्र भाऊच ! ४८ मतदारसंघात १२५ सभा, महाराष्ट्रात फडणवीसांचाच बोलबाला?
0
SHARES
25
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आम्हाला हवाय देवेंद्र भाऊच ! ४८ मतदारसंघात १२५ सभा, महाराष्ट्रात फडणवीसांचाच बोलबाला?

सध्या सोशल मिडीयावर एक गोष्ट प्रचंड व्हायरल होतीये. ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची यादी. आयपीएल आणि लोकसभा निवडणूकीच्या मौसमात फडणवीसांनी सभांचा जोरदार स्ट्राईकरेट सुरु ठेवला आहे. राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. ५ टप्प्यात तिथं मतदान होतंय. पहिल्या टप्प्याचं मतदान पुर्व विदर्भात होईल. ते १९ एप्रिला पार पडेल. १५ एप्रिलपर्यंत फडणवीसांनी १६ सभा घेतल्या. हा वेग पाहता फडणवीस येत्या काळात १२५ हून अधिक सभा घेवू शकतात. असा कयास बांधला जातोय.

केंद्रिय नेत्यांची सभांसाठीची मोठी मागणी या निवडणूकीत असते. कारण मुद्द्यांभोवती ही निवडणूक फिरते. त्यामुळे मोदी- शहा जोडींपैकी एकाची सभा उमेदवारांना हवी असते. अशात योगी आदित्यनाथांनीही राष्ट्रीय स्तरावर चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. त्यामुळे त्यांच्याही नावाला जोरदार मागणी आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता अधोरेखित करते. पुर्व विदर्भात लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान १९ एप्रिलला आहे. १५ एप्रिलपर्यंत फडणवीसांनी १६ सभा घेतल्या आहेत. प्रचाराला अजून दोन दिवसांचा वेळ आहे. या सभांची भर पडू शकते. त्यामुळे फडणवीसांच्या सभांचा एकुण स्ट्राईकरेट इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्तीचा आहे. म्हणजेच फडणवीसांनी प्रत्येक टप्प्यात २० सभा घेतल्या तरी त्यांच्या सभा हा १०० चा आकडा आरामात गाठू शकतात. कार्यकर्त्यांना मात्र १२५ ते १३० सभा फडणवीसांकडून हव्या आहेत.

मास लिडरची प्रतिमा

फडणवीसांची वाढती मागणी त्यांची लोकप्रियता दर्शवतीये. फडणवीस मास लिडर झाल्याची ही पवाती असल्याचं बोललं जातंय. फडणवीसांचा जातींचा उल्लेख ही पवारांनी केला होता. यामुळं त्यांच्यामागे संख्याबळ नसल्याचं, मास लिडर होण्याची ताकद नसल्यांच सांगण्यात येत होतं. फडणवीसांनी मात्र हे नरेटिव्ह पुरतं खोडून काढलंय. फडणवीसांच्या सभा भाजपसोबत सहकारी पक्ष असलेल्या शिंदे गट व अजित पवार गटालाही हव्या आहेत. हे शक्य झालंय फडणवीसांच्या सोशल इंजिनिअरिंगमुळे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की ओबीसी आरक्षणाचा, फडणवीसांनी यातून मध्यमार्ग काढला. दोन्ही समाजाचा असंतोष सामंज्यस्यात बदलला. पुढं मायक्रो ओबीसी समाजांना महामंडळं दिली. अहमदनगरचं नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवीनगर असं केलं. दिव्यांग बांधवांसाठी विशेष तरतुदी केल्या. दलित आणि आदिवासी प्रश्नांनाही फैलावर घेतले. त्यातूनही योग्य मार्ग काढले. फडणवीसांचं हेच सोशल इंजिनिअरिंग आता फळाला आल्याचं चित्रं आहे. राज्यातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहचण्याच प्रयत्न फडणवीसां केला होता. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील सर्वच वर्गांमध्ये फडणवीसांबद्दलची सरकारात्मक भावना तयार झाली आहे. त्याचं मतात रुपांतर करण्यासाठी फडणवीसांच्या सभा महत्त्वाच्या आहेत. असं मत महायुतीचे नेते व्यक्त करतायेत. त्यामुळं फडणवीसांची प्रतिमा मास लिडर बनल्याचं बोललं जातंय.

मविआला टक्कर

यंदाची निवडणूक मविआ विरुद्ध महायुती असं असल्याचं चित्रंय. वास्तवार मात्र पवार आणि फडणवीसांमध्ये तीव्र संघर्ष आहे. परभणीचे उमेदवार महादेव जानकर पवारांच्या गळाला लागल्याचं चित्र होतं. यात फडणवीसांनी राजकीय कसब दाखवलं. जानकरांना आपल्याकडे खेचलं. अजित पवार गटाला सुटलेल्या जागेची उमदेवारी मिळवून दिली. इथं फडणवीसांनी पवारांना शह दिला. लगचेच पवारांनी उलटा डाव टाकला. माढ्यात मोहिते पाटलांना आपल्याकडे खेचलं. पवारांनी फडणवीसांच्या खेळीची परतफेड केल्याचं बोललं गेलं. दोघांमध्ये संघर्ष सुरु असताना ठाकरे मात्र फारसे अॅक्टिव्ह दिसत नाहीयेत. महाविकास आघाडीप्रमाणे महायुतीत ही नाराजीनाट्य रंगतं आहे. मात्र ही नाराजी सोडवण्यासाठी सर्वांना ‘सागर बंगला’च महत्त्वाचा वाटतो आहे. फडणवीसांच्या या निवासस्थानी चर्चेच्या अनेक मालिका पार पडतायेत. दिवसभर सभा आणि संध्याकाळी नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याची वेळ फडणवीसांवर आलीये. महायुतीत जागा वाटपावरुन गोंधळ आहे. मात्र, कोणत्याही नेत्याने टोकाची भूमिका घेतली नाही. सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस शिवसेना भिडते आहे. मुंबईचंही चित्र तसंच आहे. हे घडत असताना महायुतीत शिस्त राखण्यासाठी फडणवीस यशस्वी ठरल्याचं चित्र आहे.

Tags: BJPDevendra fadnvisLoksabha election 2024
SendShareTweetSend
Previous Post

मोहिते पाटील परिवार लंचसाठी सुशीलकुमार शिंदेंच्या जनवात्सल्य वर; राजकीय खलबते ; सुशील कुमारांनी देवेंद्र फडणवीसांना टोला

Next Post

सोलापूरकर म्हणाले, ‘फिर एक बार मोदी सरकार’ ; भाजपा आणि महायुतीचे प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन 

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरकर म्हणाले, ‘फिर एक बार मोदी सरकार’ ; भाजपा आणि महायुतीचे प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन 

सोलापूरकर म्हणाले, 'फिर एक बार मोदी सरकार' ; भाजपा आणि महायुतीचे प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन 

ताज्या बातम्या

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने केला मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम यांचा सत्कार

30 March 2026
सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

29 March 2026
अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

27 March 2026
सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला अनेक वर्षानंतर मिळणार एमआरआय मशीन ; आ. देवेंद्र कोठे यांचा पाठपुरावा : अखेर प्रसिद्ध झाले टेंडर

25 March 2026
समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त जुळे सोलापुरात भक्तांची मांदियाळी ; हजारो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

21 March 2026
खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

खासदार ज्योतीताईंना भेटण्यासाठी झुंबड ; शपथविधी झाल्यावर पाहिले पत्र तुमच्यासाठी असेल !

16 March 2026
बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

15 March 2026
सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026

क्राईम

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1973465
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group