सोलापुरात देवेंद्र फडणवीस यांचा दंगलीचा प्लॅन होता ; खा.प्रणिती शिंदे यांचा थेट आरोप
सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या खासदार म्हणून विजयी झाल्याबद्दल दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा कृतज्ञता मेळावा आयोजित करण्यात आला होता.
यावेळी उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना भाजपच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.
देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता, त्यांना माहीत होते की निवडणूक त्यांच्या हातून गेली म्हणून ही कट कारस्थाने त्यांनी केली. त्यांची मतदानाच्या पाच दिवस अगोदरची भाषणे काढून बघा, त्यांच्या हालचाली तशाच होत्या, मतदानाच्या दिवशी पोलीस आयुक्त सतर्क राहिले म्हणून प्रसंग टळले. दरम्यान काय म्हणाल्या प्रणिती शिंदे पहा हा व्हिडिओ…