पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर व पुजास्थळांची स्वच्छता’ या अभियानाअंतर्गत श्री मुंबादेवी मंदिर येथे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दर्शन घेत मुंबादेवी मंदिर परिसर स्वच्छता केली.
यावेळी माध्यमांशी बोलताना मोदीजी यांनी सर्वांनाच आवाहन केलंय, आपली श्रद्धास्थान स्वच्छ ठेवावी. अयोध्येत श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करतोय, त्यावेळी मंदिरं स्वच्छ असावी म्हणून आम्ही प्रतिकात्मक स्वच्छता केलेली आहे असे सांगतानाच शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.