एकनाथ शिंदेंनी मारले पंढरपुरात मार्केट ; बुलेट वारी करत वारकऱ्यांच्या घेतल्या भेटी
सोलापूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सोलापूरचा दौरा केला हा दौरा विशेष करून पंढरपूरसाठी होता. यापूर्वी त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री असताना आषाढी एकादशीची महापूजा केली होती. त्यावेळीही त्यांनी एकादशीच्या पूर्वी येऊन वारकऱ्यांची हितगुज करत सुविधांची पाहणी केली होती.
यंदाही ते उप मुख्यमंत्री असताना सुद्धा त्यांनी आषाढी वारीच्या दोन दिवस अगोदर येऊन पांडुरंगाचे दर्शन घेतले.
पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांच्या सोबत बुलेट सवारी करून वाळवंटा मधील सर्व सुविधांची पाहणी केली. पहा ते सर्व फोटो










