राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुंबई आणि सुरत या दोन शहरातील फरक सांगितला. विरोधकांकडून भाजपवर होत असलेल्या टीकेवर त्यांनी सडेतोड भाष्य करताना संपूर्ण आकडेवारी वाचून दाखवली ते काय म्हणाले पहा,
सुरत डायमंड बुर्सचे उदघाटन झाले, हे खरे आहे.
पण, सुरत डायमंड बुर्स आणि मुंबईत असलेला भारत डायमंड बुर्स या दोन्हीच्या कार्यपद्धतीत फरक. सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब, तर मुंबई हे मॅन्युफॅक्चरिंग आणि एक्सपोर्ट हब. या मुंबईच्या हबमधून एकही उद्योग सुरतेत गेलेला नाही.
भारतातील 38 बिलियन डॉलर्स इतकी जेम्स अँड ज्वेलरीची निर्यात ही एकट्या मुंबईतून होते. ती एकूण निर्यातीच्या 75 टक्के
सुरतचा निर्यातीतील वाटा : 12 टक्के
जयपूरचा वाटा : 3.12 टक्के
पॉलिश डायमंडच्या एकूण निर्यातीपैकी मुंबईतून 97 टक्के
आता तुम्ही कोरोना काळात सारेच बंद करुन टाकले, त्यामुळे काय झाले तेही पहा.
2020-21 : मुंबई : 94.25 टक्के,
सुरत : 5.57 टक्के.
आता
2023-24 : नोव्हेंबर 23 पर्यंत
मुंबई : 97.13 टक्के, सुरत : 2.57 टक्के
💎 स्टडेड गोल्ड ज्वेलरी निर्यात
मुंबई : 66.51 टक्के, सुरत: 9.96 टक्के
💎 प्लेन गोल्ड ज्वेलरी निर्यात
मुंबई : 27.32 टक्के, सुरत : 8.79 टक्के
💎 आता मुंबईचा जेम्स अँड ज्वेलरी पार्क इटली आणि तुर्कीच्या धर्तीवर होणार
💎 मध्यंतरी युएई आणि भारत सरकार यांच्यात एक करार झाला. त्यात मुंबईला उत्पादन केंद्र म्हणून भक्कम करणार.
💎 महापेत 20 एकर जागा दिली आणि आशियातील सर्वांत मोठा ‘जेम्स अँड ज्वेलरी पार्क’ तेथे उभा राहतोय.
💎 या पार्कसाठी 5 एफएसआय
💎 वीजदरात सवलत
💎 जीएसटीतून दिलासा असे अनेक निर्णय
💎 मलबार गोल्डची ऑक्टोबरमध्ये 1700 कोटींची गुंतवणूक
💎 तनिष्क सुद्धा डायमंड क्षेत्रात गुंतवणूक करते आहे आणि तुर्की डायमंड बुर्स सुद्धा मुंबईत येतो आहे
पंतप्रधान मोदी यांनी 2030 पर्यंत हिरे उद्योग 75 बिलियन डॉलर्स इतका मोठा व्हावा, अशी अपेक्षा केली आहे. याचा मोठा फायदा मुंबईलाच होणार आहे. मुंबई ही मुंबई आहे. मुंबईचे महत्त्व तुम्ही कमी करू नका !!!