सोलापूर दिनांक – ६ जानेवारी २०२३ रोजी सोलापूर शहरात हिंदू जन आक्रोश मोर्चा आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त निघालेल्या मोर्चातील काही हुल्लडबाज तरुणांनी कोंतम चौक परिसरातील काही दुकानांवर दगडफेक करून सोलापूर शहरातील शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यदक्ष पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडला.त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाचे अभिनंदन करणारे आणि आगामी काळात टी.राजासारख्या प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या व्यक्तींना प्रवेश बंदी काढण्यासंबंधीचे निवेदन अल्पसंख्यांक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती, डीवायएफआय अर्थात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि कॉ गोदुताई परुळेकर गृहनिर्माण संस्थेच्या वतीने माजी नगरसेविका नलिनि कलबुर्गी आणि युसुफ मेजर यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाद्वारे सोलापूर शहर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले.
सोलापूर शहरात आलेल्या तेलंगणाचे आमदार टी.राजा आणि आमदार नितेश राणे यांनी एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून वक्फ बोर्ड बरखास्त करण्याची भाषा केली. तसेच सोलापूर शहरातील हिंदू तरुणांची माथी भडकवणारे प्रक्षोभक वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूर शहरात तणाव निर्माण झाला असून कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचे काम स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या टी.राजा आणि नितेश राणे यांनी यांनी केले आहे.म्हणून अशा वादग्रस्त व्यक्तींना आगामी काळात सोलापूर शहरात प्रवेश बंदी करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
तसेच दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी निघालेल्या आक्रोश मोर्चात हुल्लडबाजी करून अनेक दुकानांची नासधूस करणाऱ्या कार्यकर्त्यांना अटक झाली आहे,मात्र त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी एका शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे करण्यात आली.. निवेदन देण्यासाठी हिंदू मुस्लिम ख्रिश्चन आणि बौद्ध समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.. सर्व जाती धर्मातील मानवतावादी विचारांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समाजकंटकांविरुद्ध पाऊल उचलल्यामुळे याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना सोलापुरात थारा नाही जणू असा संदेशच अल्पसंख्यांक हक्क संघर्ष परिषद, जातीअंत संघर्ष समिती, डी वाय एफ आय आणि गोदुताई परुळेकर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे..
याप्रसंगी रंगप्पा मरेडी, माऱ्याप्पा पंदेलोलू, इलियास सिद्दीकी,आसिफ पठाण,अकील शेख, विक्रम कलबूर्गी,ॲड.अनिल वासम, दत्ता चव्हाण,रफिक काजी,नरेश दुगाणे, दाऊद शेख,दीपक निकंबे,शंकर म्हेत्रे ,सुनंदा बल्ला,फातिमा बेग, शकुंतला पाणीभाते,अमित मंचले, नरसिंग म्हेत्रे,युसुफ शेख,संजय ओंकार, श्रीकांत कांबळे, शहाबुद्दीन शेख, वसीम मुल्ला, आप्पाशा चांगले,हसन शेख, शाम आडम आणि इतर महिला व पुरुष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.