सोलापूरच्या स्टार लेकीने गाजवल्या राज्यात सभा ; प्रणिती शिंदेंना प्रदेश काँग्रेसने दिले स्पेशल चॉपर
सोलापूर : सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करून खासदार झालेल्या प्रणिती शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत राज्यात अनेक सभा गाजवल्या. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने स्टार प्रचारक म्हणून केलेली नियुक्ती त्यांनी सार्थ ठरल्याचे पाहायला मिळाले. अनेक मतदारसंघातून त्यांच्या भाषणाची डिमांड आल्याचे समजते.
यंदाची विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीसाठी अतिशय महत्वाची मानली जाते. काँग्रेस पक्षात खासदार प्रणिती शिंदे यांची प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांनी प्रचाराला यावे म्हणून मागणी वाढली आहे. महाराष्ट्रात फिरणे अवघड असल्याचे लक्षात घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांना विशेष हेलिकॉप्टर दिले.
प्रणिती शिंदे यांनी ठिकठिकाणी जाहीर सभा, पदयात्रा आणि महिला मेळाव्याला उपस्थिती लावली. तिथे कार्यकर्ते, जनतेमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला, प्रणिती शिंदे यांचे जोरदार स्वागत तर झालेच पण लोकसभेत मिळवलेल्या विजयानंतर त्यांची महिला, युवक व युवती यांच्यात प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
खासदार प्रणिती यांनी लातूर धीरज देशमुख, शिरोळ गणपतराव पाटील, कोल्हापूर ऋतुराज पाटील, राहुल पाटील, चिखली राहुल बोंद्रे, भुसावळ राजेश माळवदकर, धुळे कुणाल पाटील आणि हातकलंगले राजू आवळे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या आहेत.
आता राहिलेले सर्वच दिवस प्रणिती शिंदे या आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघात ठाण मांडून राहणार आहेत. शहर मध्य हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला असल्याने तो हातून घालवायचा नाही.