सोलापूर : काँग्रेसच्या नेत्या, प्रदेश कार्याध्यक्ष, आमदार प्रणिती शिंदे यांनी यंदा आपला ‘फोकस’ शहर उत्तर या भाजपच्या बालेकिल्ल्यावर ठेवला आहे. महापालिकेचे रणशिंग याच मतदारसंघातून त्यांनी फुंकले.
महेश कोठे हे शहर उत्तर मध्ये काँग्रेसची ताकत होती मात्र कोठे यांनी काँग्रेस पक्षाला सोडल्याने त्याठिकाणी भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली, मात्र यंदा भाजपच्या बालेकिल्ल्यात घुसण्याची भाषा आमदारांनी केली आहे.
सध्या युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडणुका लागल्या आहेत, त्यामुळे काँग्रेस पक्षाचे शहर उत्तर वर विशेष लक्ष आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात शरद गुमटे हा कार्यकर्ता निवडणूक लढवत आहे. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे त्याला संबोधले जाते. सर्वसामान्य कुटुंबातील सदस्य, सर्वांसोबत जुळवून घेणारा हा कार्यकर्ता आहे.
शहर उत्तर मध्ये चांगल्या चांगल्यानी काँग्रेसची साथ सोडली असताना एक कार्यकर्ता, ज्याच्या नावात “शरद” आहे, तो काँग्रेसशी एकनिष्ठ राहिला, पक्षाची प्रतिमा उंचावली, त्याला काँग्रेस पक्षात निवेदनाचा बादशहा म्हणतात. त्याच्या निवेदनाचा विषय इतका स्ट्रॉंग असतो की, याची दखल केंद्र आणि राज्य पातळीवर घेतली गेली आहे.
शहर उत्तर मतदारसंघात केवळ आणि केवळ युवक अध्यक्ष पदासाठी एकमेव शरद गुमटे याचाच बोलबाला आहे. आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक असल्याने गुमटे याचा या निवडणुकीत सर्वात मोठा प्लस पॉईंट मानला जातोय.
शरद गुमटे याने पाठपुरावा केलेले विषय जर पाहिले तर अजब वाटेल इतके महत्वाचे विषयांचा गुमटे याने पाठपुरावा केला आहे का? असा प्रश्न पडेल.
■ रुपाभवानी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवला.
■ सोलापूर बार्शी रस्त्याला केंद्रीय वनमंत्री मार्फत मंजुरी मिळवली.
■ झोपडपट्टी भागात विद्युत तारा काढून आधुनिक पद्धतीच्या बंच केबल घालून घेतल्या.
■ महाराष्ट्रातले पहिले लिंगायत समाज भवन सोलापुरात मनपा सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर.
■ मार्केट यार्डाच्या मुख्य चौकात अश्वारूढ भव्य बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसविनार महापालिकेत ठराव मंजूर करून घेतला.
■ रुपाभवानी मंदिरासमोरील शंभर वर्षे जुने पूल नव्याने बांधून घेण्यासाठी प्रयत्नशील प्रशासकीय मान्यते साठी प्रस्ताव सादर.
■ सोलापूर शहरासाठी स्वतंत्र फिरते पशुचिकित्सालय व्हॅन मंजूर.
■ भवानी पेठेतील दोनशे वर्षे जुन्या चिमणीला हेरिटेजचा दर्जा मिळवून घेतला.
★ आगामी काळात अनेक महत्वाचे विषय शासन दरबारी पाठपुराव्यासाठी आहेत ते म्हणजे….
■ सोलापूर शहर उत्तर साठी स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे सादर आहे.
■ आगामी काळात देखील शहर उत्तर मध्ये स्वतंत्र क्रीडांगण दोन ते तीन प्रत्येक भागात मोठे बगीच्या वाढीव हद्दवाढ दुर्लक्षित भागात आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्यामार्फत नव्याने योजना लागू करून ड्रेनेज लाईन, पिण्याचे पाईपलाईन साठी 25 कोटी निधीची मागणी करणार आहे.
■ अकलूजच्या धर्तीवर शहर उत्तर मध्ये थीम वॉटर पार्क मनपाच्या जागेत बांधून घेणार आहे.