अशोक निंबर्गी सर, आपण काँग्रेसमध्ये हाच मोठा विनोद ; अमोल बापूंचे कौतुक मनीषरावांच्या ‘काळजा’ला लागले
सन्मा . अशोकजी निंबर्गी सर
माजी शहर अध्यक्ष .भाजपा
आता काँग्रेस कार्यकर्ते ..
निम्बर्गी सर जय महाराष्ट्र
आपली बाईट बघितली. आणि जणू काय असा भास झाला की गेली 30-40 वर्षे आपण काँग्रेसचे कार्यकर्ते आहात की काय.. खरंतर गेल्या काही महिन्याखालीच आपण भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेला आहात… आणि आपण बोलताना बोललात की थकवा दूर झाला म्हणजे .भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला थकवा आलेला आहे हे आपण जणू सांगितलातच… भाजपमध्ये प्रमुख पदावर असणारा व्यक्ती जाऊन तिकडे कार्यकर्ता होतो आणि अवघ्या काही महिन्यातच त्यांना थकवा येतो हे देखील आज जनतेला कळालेला आहे…. असो कसा का होईना थकवा हा दूर झाला. परंतु आपणास सांगायचे आहे की ज्यावेळेस गेल्या दोन टर्मला शहर मध्ये मधून एकदा 37000 चा आणि एकदा 52000 चा सुमारे 50 हजारांचा लीड हा शहर मध्य मधून लोकसभेला भाजपाला आहे आणि तेव्हा आपण भाजपचे विद्यमान अध्यक्ष होता हे विसरलात की काय…. आणि आत्ता तो लीड नक्कीच दुप्पट होणार यात शंका नाही .परंतु हा जर आपणाला विनोद वाटत असेल तर यावरून समजतो की आपण भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलात हा किती मोठा स्वतः सोबत विनोद करून घेतला आहात…
आणि राहिला प्रश्न आमच्या महापालिकेच्या तिकिटाच्या कुणाला किती जागा सोडण्याच्या याची वकिली आपण करावी अशी अपेक्षा नाही आहे. खरंतर युतीमध्ये अनेक वर्ष तुम्ही काम केलेला आहे परंतु काँग्रेसमध्ये गेल्यानंतर कुठेतरी विसरभोळेपणाचे सवय झाली की काय कारण युतीमध्ये एकच जागा देणे आणि सर्व जागा दुसरे पक्ष लढवणे असं नसतं आपणही शहराध्यक्ष होतात याची विसर ही काँग्रेसने तुम्हाला पाडून एक कार्यकर्ता बनवून ठेवलेला आहे……
असो जनता आणि कार्यकर्ते हुशार आहेत सगळ्यांना माहिती आहे की भाजप पक्ष सोडून काँग्रेसमध्ये गेल्यावर नक्की विनोद कोणाचा झालाय. त्यामुळे आमच्या युतीमध्ये महापालिकेच्या जागा कुणाला किती मिळतील हे बघण्यापेक्षा आपला काँग्रेस राहील की नाही याची चिंता जास्त करा…. कारण शहर मध्ये ज्या जनतेला आता तुमच्या काँग्रेसचे आमदाराचा थकवा आलेला आहे….
जय महाराष्ट्र….
मनीष काळजे
शिवसेना जिल्हाप्रमुख सोलापूर…