बैठक सोडून जिल्हाधिकारी स्वामी आले अन्
जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी साधला मुक्त संवाद
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये गुणवत्ता वाढावी यासाठी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी पुढाकार घेतला आहे. यासाठी स्वतः शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करत आहेत. यामुळे जिल्हाधिकारी विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. यामुळे शुक्रवारी (दि. २७) रोजी फुलंब्री तालुक्यातील रेलगाव, सोनारी आणि वावना या गावातील जिल्हा परिषद शाळाच्या विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संवाद साधला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुलांना प्रश्न विचारले असता त्या प्रश्नांची मुक्तपणे उत्तरे दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील विभागांमध्ये भेट देऊन कामकाजाविषयी माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दससूत्री कार्यक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच आयटीक्षम, संस्कारक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी जिल्हाधिकारी स्वामी यांनी विविध शाळांमध्ये जाऊन कार्यशाळा, मार्गदर्शन शिबीर घेण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी नेहमी दारे खुली असल्याचे स्वामी यांनी सांगितले होते. याचा प्रत्यय शुक्रवारी पाहायला मिळाला. भेटायला विद्यार्थी आल्यानंतर जिल्हाधिकारी स्वामी यांनी मिटिंग मध्ये असताना देखील त्यांना वेळ देऊन मनसोक्त गप्पा मारल्या. या १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांनी शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज पुरणवास्तू संग्रहालय, बीबी का मकबरा, सिद्धार्थ उद्यान, हुरडा पार्टी फार्म आदी ठिकाणी भेट दिली.
यावेळी शिक्षक शिवानंदा भानुसे, सविता म्हस्के, जयश्री कस्तुरे आदी शिक्षक उपस्थित होते.