जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी जपली मैत्री ; मीना पवारांच्या अंत्यविधीला उपस्थितीसह लिंगराज कुटुंबीयांचे सांत्वन
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी तथा छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी आपली मैत्री जपल्याचे पाहायला मिळाले.
जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य वित्त व लेखा अधिकारी तथा म्हाडा मुंबईचे वित्त नियंत्रक अजयसिंह पवार यांच्या मातोश्री मीना पवार यांचे निधन झाले त्यांच्यावर रविवारी सकाळी साडेदहा वाजता मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी या अंत्यविधीला उपस्थिती लावून अजयसिंह पवार कुटुंबियांचे सांत्वन केले. या अंत्यविधीला पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी धनराज पांडे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेचे सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज यांचे अपघाती निधन झाले. लिंगराज आणि दिलीप स्वामी यांची चांगली मैत्री होती. त्यावेळी प्रशासकीय कामकाज जास्त त्यांना सोलापूरला येत आले नाही परंतु रविवारी सोलापूर दौऱ्यावर आले असता स्वामी यांनी लष्कर परिसरातील लिंगराज यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या पत्नी आणि मुलांची भेट घेऊन सांत्वन केले. अनुकंपाची नोकरी, पेन्शन, अपघात विमा यासंदर्भात करणे चर्चा केली. यापुढे कोणतीही अडचण आल्यास थेट संपर्क करा असे कुटुंबियांना सांगितले. यावेळी डॉक्टर एस पी माने, श्रीशैल देशमुख, सचिन जाधव हे उपस्थित होते.