जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार
छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
24-25 या काळात वाचन क्षमतेत लक्षणीय सुधार दर्शवणाऱ्या इयत्ता 6 ते 8 वी च्या मुलांची संख्या या निकषांच्या क्रमवारीत पंधरा स्थानाची झेप घेणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा विशेष कौतुकास पात्र झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते गुरुवारी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांना दैनिक लोकसत्ता कडून विशिष्ट विकास निदर्शक हा पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. त्याबद्दल स्वामी यांचेवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.