Tuesday, June 9, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची अशासकीय संस्थांना सक्त ताकीद ; पूर्व सूचना दिल्याशिवाय…..

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
17 May 2024
in Administration
0
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची अशासकीय संस्थांना सक्त ताकीद ; पूर्व सूचना दिल्याशिवाय…..
0
SHARES
1.2k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांची अशासकीय संस्थांना सक्त ताकीद ; पूर्व सूचना दिल्याशिवाय…..

सोलापूर :- जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियान अंतर्गत कामे मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या अंतर्गत जिल्ह्यातील 252 कामांना प्रशासकीय मान्यता दिलेली आहे. यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अशासकीय संस्थाकडून कामे सुरू आहेत, परंतु काही अशासकीय संस्था संबंधित शासकीय यंत्रणेला कोणतीही पूर्वसूचना न देता कामे सुरू करत आहेत. ही बाब अत्यंत चुकीची असून अशासकीय संस्थांनी या पुढील कामे कोणतीही पूर्व सूचना न देता सुरू करू नयेत अन्यथा अशा संस्थांना काळ्या यादीत टाकले जाईल याची नोंद घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, प्रांताधिकरी विठ्ठल उदमले, प्रांताधिकारी
सदाशिव पडदूने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, वरिष्ठ भू वैज्ञानिक श्री. शेख यांच्यासह सर्व समिती सदस्य व अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की अशासकीय संस्थांना गाळमुक्त धरण अंतर्गत कामे करत असताना शासकीय यंत्रणांकडून सहकार्य करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने अशासकीय संस्थांनी ही शासनाने घालून दिलेल्या विहित अटी व शर्तीनुसार कामे केली पाहिजे. अशासकीय संस्थांच्या ज्या काही अडचणी येथे मांडण्यात आलेल्या आहेत त्या नक्कीच सोडवण्यात येतील, परंतु या संस्थांनी गाळ काढण्याचे कोणतेही काम सुरू करत असताना संबंधित शासकीय यंत्रणेला पूर्वकल्पना द्यावी. तसेच काम पूर्ण झाल्यानंतरही त्याविषयी सविस्तर माहिती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.

अशासकीय संस्थांनी गाळ काढत असताना तो गाळ कोणत्या शेतकऱ्यांच्या शेतावर टाकला जात आहे त्या संबंधित शेतकऱ्यांच्या नावांची यादी तयार करावी. संबंधित शासकीय यंत्रणा कामावर भेट व पाहण्यासाठी आल्यावर त्या शेतकऱ्यांची यादी यंत्रणेला उपलब्ध करून द्यावी. त्याप्रमाणेच जलसंधारण विभागाने या सर्व कामांची माहिती रोजच्या रोज अद्यावत करण्यासाठी अवनी ॲप उपलब्ध करून दिलेले आहे. त्यावर संपूर्ण अद्यावत माहिती व्यवस्थितपणे भरावी. ही माहिती भरत असताना काही अडचण येत असतील तर त्या अनुषंगाने सर्व शासकीय संस्थांच्या तांत्रिक व्यक्तींचे प्रशिक्षण लवकरच आयोजित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 252 कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली होती त्यातील 81 कामे पूर्ण झालेली आहेत. सद्यस्थितीत 27 कामे सुरू आहेत तर 79 कामे सुरू झालेली नाहीत. जी कामे सुरू झाली नाहीत ती कामे आचारसंहिता संपल्यानंतर तात्काळ सुरू करावीत. तसेच मंजूर कामातून 65 कामे रद्द करण्याची शिफारस संबंधित यंत्रणांनी केलेली आहे. ती कामे का रद्द करावीत याचा अहवाल कारणासह तात्काळ संबंधित यंत्रणांनी प्रशासनाला सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
यावेळी जलयुक्त शिवार अभियान 2.0 चा ही आढावा घेऊन संबंधित यंत्रणांनी कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

प्रारंभी जिल्हा जलसंधारण अधिकारी श्री. दामा यांनी जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत 252 कामामधून 81 कामे पूर्ण झालेली आहेत. या 81 कामापैकी 52 कामे सन 2023 मध्ये पूर्ण होऊन त्यातून 21.33 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आलेला असून तो अंदाजे 600 हेक्टर क्षेत्रावर टाकलेला आहे त्याचप्रमाणे सन 2024 मध्ये 29 कामांमधून 20.61 लक्ष घनमीटर काढून तो अंदाजे 550 हेक्टर क्षेत्रावर पसरवलेला आहे यातून जवळपास 1 हजार 600 शेतकऱ्यांना लाभ झालेला असून एकूण 0.148 टीएमसी पाणी साठवण क्षमता निर्माण झालेली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्याचप्रमाणे सद्यस्थितीमध्ये 27 जलसाठ्यामधून गाळ काढण्याचे काम सुरू असून त्यातून आत्तापर्यंत 11.61 लक्ष घनमीटर गाळ काढलेला आहे. जी 79 कामे सुरू झालेले नाहीत त्यातील 15 कामे जलसंपदा विभाग 51 कामे जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग व 13 कामे मृद व जलसंधारण विभागाची असल्याचेही त्यांनी सांगितले.

Tags: Collector kumar ashirwadगाळमुक्त धरणगाळयुक्त शिवार
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरातील बाळे येथे युवकाचा संशयास्पद मृत्यू ; पूर्ववैमनस्यातून खून झाल्याची चर्चा

Next Post

सोलापुरात देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; ते भडक भाषण आले अंगलट

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; ते भडक भाषण आले अंगलट

सोलापुरात देवेंद्र कोठे यांच्यावर गुन्हा दाखल ; ते भडक भाषण आले अंगलट

ताज्या बातम्या

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026
सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

सोलापूर पुणे हायवेवर भरधाव ट्रकची दुचाकीला समोरून धडक ; एका तरुणाचा जागीच मृत्यू

31 May 2026
विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

विधान परिषदेच्या रणधुमाळीत कुठे आहेत राजकीय चाणक्य ? वाढदिनी स्पेशल रिपोर्ट

29 May 2026
व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

व्वा भारीच की ! दोन बनसोडे सोलापूर दक्षता व नियंत्रण समितीवर सदस्य

24 May 2026
जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

21 May 2026

क्राईम

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

by प्रशांत कटारे
6 May 2026
0

"हे एक दिवस होणारच होतं" ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत भांड्यांचा संच...

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1982058
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group