मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पाटील महामंडळाच्या चार लाभार्थ्यांना मिळणार धनादेश
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी सोलापूर दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत 1348 घरांचे वितरण करण्यात येणार आहे. याच दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत मंजूर झालेल्या कर्जाच्या धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.
चार दिवसांपूर्वी मुंबईमध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच सोलापूरचे अनंत जाधव यांची बैठक झाली होती.
महामंडळा अंतर्गत सोलापुरातील कर्ज मंजूर झालेल्या प्रभाकर प्रल्हाद मोरे 15 लाख, हेमलता संजय कोडक साडेनऊ लाख, संगीता धर्मराज चटके पंधरा लाख, शरद किसन मोठे पंधरा लाख अशा चार लाभार्थ्यांना या धनादेशाचे वाटप करण्यात येणार आहे.