सीना-भीमा नदीवरील बंधा-यांची दरवाजे बंद करा ;
अमर पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
उजनी धरणातून सोडलेले पाणी थेट कर्नाटक राज्यात वाहून जात आहेत. त्यामुळे काही दिवसानंतर नद्या कोरड्या पडण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी दोन्ही नदीवरील सर्व बंधा-यांचे दरवाजे बंद करून पाणी आडवावेत. सीना-भीमा नदीकाठी चोवीस तास वीजपुरवठा करावा. सोलापूर शहराला दिवसा रोज पाणीपुरवठा करावेत. शिरवळ तलावात उजनीचे पाणी सोडावेत यासह इतर मागण्याचे निवेदन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे केली आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख पाटील म्हणाले, सध्या उजनी धरण ओव्हर फ्लो झाला आहे. जिल्ह्यातील अनेक कालव्यांना आणि तलांवाना पाणी सोडले जात आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातही उजनी धरणाचे पाणी सोडणे गरजेचे आहे. दक्षिण तालुक्यात हणंमगाव तलावात उजनीचे पाणी सोडले जात आहे. हा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यावर तेथील अतिरिक्त पाणी सांडव्याद्वारे नैसर्गिक पद्धतीने शिरवळ तलावात येणार आहे.
तरी लवकरात लवकर या तलावात सोडण्यात यावेत. सीना- भीमा नदीकाठी चोवीस तास वीज पुरवठा करावेत. शेत-शिवारात जळालेले विजेचे डीपी त्वरित दुरुस्त करावेत.शेतकरी बांधवांना पी.एम.किसान योजनेचे पैसे त्वरित मिळावेत. रब्बी हंगामासाठी उच्च दर्जाचे बी- बियाणे उपलब्ध करून द्यावेत. शेतकरी बांधवांना गतवर्षीचे दुष्काळ निधी आणि अतिवृष्टीचे नुकसान भरपाई मिळावेत. सध्या सोलापूर शहराला रात्री पाणी सोडले जाते त्यामुळे अनेकांची झोपमोड होते. त्यामुळे सकाळी कामाला जाताना उशीर होतो. यासाठी सोलापूर शहराला रोज दिवसा पाणीपुरवठा करावा.
वरील प्रश्न त्वरित सोडवून शेतकरी बांधवांना आणि जनतेला दिलासा द्यावेत अशी मागणी पाटील यांनी शेवटी बोलताना केली. यावेळी जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील, तालुकाप्रमुख योगिराज पाटील, निंगराज हुळ्ळे, विजयकुमार वाले, राहुल गंधुरे, अजय खांडेकर, अंबादास मलाडे, शिवराज माळशेट्टी आदी उपस्थित होते.