करारा नाही अर्र.रा… ‘ना इंसाफी नहीं’ उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की ; श्रीदेवी फुलारे यांची स्टंटबाजी कायम
सोलापूर : सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात काँग्रेस पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली होती. त्यामध्ये प्रामुख्याने मुस्लिम समाज, मोची समाजाचे कार्यकर्ते नाराज होते.
मुस्लिम समाजातून काँग्रेसचे शौकत पठाण यांनी तर बहुत ना इंसाफी हुई है, करारा जवाब मीलेगा असे शब्द वापरत आपला उमेदवारी अर्ज भरला होता. पण त्यांच्यावर माघार घ्यायची नामुष्की ओढवली.
काँग्रेसच्या विजयात मोलाचा वाटा असलेल्या मोची समाजातून माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे, माजी युवकाध्यक्ष अंबादास करगुळे पक्षाने उमेदवारी न दिल्याने अपक्ष अर्ज भरले होते यावेळी त्यांनी पक्षाने विश्वासात घेतले नाही कुणी विचारले नाही असा आरोपी केला होता. पण या दोघांनी माघार घेतली. म्हणे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आमची समजूत काढली.
माजी नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी फाटकी साडी घालून उमेदवारी अर्ज भरला होता. माघार घेताना मात्र त्या अंगावर सोने घालून आल्या होत्या.
यावेळी गाजावाजा आणि प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करत अर्ज दाखल केला परंतु शेवटी त्यांनी माघार घेतली त्यामुळे ही सुद्धा प्रसिद्धीची केवळ स्टंटबाजी होती का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.