मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा आला दुसऱ्यांदा पदभार ; संदीप कोहिनकर लकी !
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर हे दुसऱ्यांदा लकी ठरले आहेत त्यांच्याकडे 21 दिवसांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार आला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम २१ दिवसांसाठी रजेवर गेले आहेत. रजेवर जाण्यापूर्वी त्यांनी आपला पदभार अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर यांच्याकडे दिला.
सोमवारी कोहिनकर यांनी सीईओ पदाचा पदभार स्वीकारला. तातडीने सर्व विभाग प्रमुखांची बैठक घेऊन निधी खर्चाचा आढावा घेतला.
यापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे प्रशिक्षणासाठी मसूरी येथे गेले असता 24 दिवसासाठी त्यांच्याकडे केवळ दीड महिन्यातच सीईओ पदाचा पदभार आला होता. त्यावेळी कोहिनकर यांना जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली. लोकाभिमुख बजेट सादर करीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.