चरणराज चवरे व आमदार यशवंत माने यांच्यात शाब्दिक चकमक ! अनगर अपर तहसील कार्यालयाचा वाद पेटला
सोलापूर : मोहोळ तालुक्यातील अनगर येथे नुकत्याच मंजूर झालेल्या अपर तहसील कार्यालयावरून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत प्रचंड वादावादी पाहायला मिळाली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या ऑफर तहसील कार्यालयाला प्रचंड विरोध केला.
एकीकडे मुख्यमंत्र्यांचा शब्द हा आदेश असल्याचे आपण सांगता मग अनगरचे अपर तहसील कार्यालय रद्द करण्याचे इंडोसमेंट पत्रावर त्यांनी मारले आहे. मग ते रद्द का झाले नाही? प्रशासनाने काय कारवाई केली? जर हे रद्द न झाल्यास शंभर लोकांचे मृत्यू होतील असे सांगताना सभागृहात बसलेल्या आमदार यशवंत माने कडे पाहून त्यांनी या आमदार यशवंत माने मुळेच मोहोळमध्ये ही अवस्था झाल्याचा थेट आरोप करत एकेरी उल्लेख केला.
याच वेळेस आमदार माने यांनी ‘ये चरण’ असे म्हणताच इकडून मनिष काळजे यांनी चवरे यांची बाजू घेऊन माने यांचा निषेध नोंदवला तर तिकडून यशवंत माने यांच्या बाजूने जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव यांनी चवरे यांना शिंगावर घेतले. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला, अरे तुरेची भाषा वापरण्यात आली.
शेवटी पालकमंत्र्यांनी सर्वांना गप्प करून या विषयावर येता काही दिवसात मंत्रालयात या सर्वांना बोलवून तोडगा या विषयावर येता काही दिवसात मंत्रालयात या सर्वांना बोलवून हे कार्यालय नगर येथून रद्द करण्याचा थेट आदेश काढण्यासाठी सूचना करू असे सांगताच सर्व शांत झाले पहा काय घडले हा व्हिडिओ ..