सीईओ कुलदीप जंगम यांनी झेडपीत नारी शक्तीचा केला असा सन्मान
सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने सालाबाद प्रमाणे नवरात्री उपवास करणारे जिल्हा परिषद, पंचायत समिती दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर मधील सर्व महिला कर्मचाऱ्यांना पोष्टिक व शक्तिवर्धक लाडू वाटप मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन स्मिता पाटील, लेखाधिकारी रूपाली रोकडे व सर्व महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
या निमित्ताने कुलदीप जंगम यांनी नवरात्री व दसरा शुभेच्छा सर्व महिला कर्मचारी यांना दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तजमुल मुतवली, डॉ.एस. पी माने, श्रीशैल्य देशमुख, विशाल घोगरे, रोहित घुले, बसवराज दिंडोरे, राकेश सोड्डी, विलास मसलकर, संतोष शिंदे, शिवानंद मह्मणे, रोहीत शिंदे आदींनी परिश्रम घेतले.