जातीच्या दाखल्याची ५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करा ; पत्रकार अक्षय बबलाद यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
सोलापूर (प्रतिनिधी)- शिक्षणासाठी जातीचा दाखला हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा दाखला असून अनेक लोकांना, विद्यार्थ्यांना जातीचा दाखला काढत असताना १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची मागणी संबंधित यंत्रणा कडून केली जाते. ज्यामध्ये अनेक ग्रामीण भाग असो वा शहरी भाग असो सध्याच्या घडीला १९५० वर्षापूर्वीचा पुरावा असणे व सादर करणे कठीणच आहे.
त्यामुळे सदरील पुरावा नसल्यास जातीचा दाखला मिळणे म्हणजे फार मोठे अडचणीचे ठरत आहे. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी जातीच्या दाखल्या अभावी प्रवेश घता येत नसल्याने विशेष करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घ्यायचं नाही का? अश्या अनेक प्रश्नांनी विद्यार्थी भेडसावत असून मोठ्या मानसिक त्रासाला व अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून १९५० वर्षा पूर्वीच्या पुराव्याची अट रद्द करण्यात आली पाहिजे आणि जातीचा दाखला त्यांच्या पालकांचा (वडिलांचा) असल्यास त्या दाखल्याच्या आधारावर ग्राह्य धरून त्या विद्यार्थी तथा पाल्याला १९५० वर्षापूर्वीच्या पुराव्याची सक्तीचा न करता जातीचा दाखला देण्यात यावे जेणेकरून देशाचे उज्वल भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल आणि होणारा मानसिक त्रास कमी होईल त्याचबरोबर शिक्षणास मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळेल.अश्या आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी सोलापूर यांना देण्यात आले यावेळी पत्रकार अक्षय बबलाद, पत्रकार अनसार शेख उपस्थित होते.