ब्रेकिंग : शरद पवारांचा सोलापूर दौरा रद्द ; असे होणार पुतळा अनावरण
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार शरद पवार शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या हस्ते स्वर्गीय चंद्राम चव्हाण गुरुजी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे जलसंधारण मंत्री संजय राठोड या मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
शरद पवार हे सोलापूरला मुक्कामी येणार असल्याने या कार्यक्रमाचे राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली होती. नेहरूनगर या ठिकाणी या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
दरम्यान शरद पवार यांचा सोलापूर दौरा अचानक रद्द झाल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली, याप्रकरणी सोलापूरचे निरीक्षक शेखर माने यांच्याकडून अधिक माहिती घेतली असता त्यांनी सांगितले की, शरद पवार यांचे सातारा जिल्ह्यात कार्यक्रम वाढले आहेत त्यामुळे त्यांना एकही थांबावे लागणार असून ते सोलापूरच्या कार्यक्रमाला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहून पुतळा अनावरण करणार आहेत.