ब्रेकिंग : सोलापुरात काँग्रेस भाजपवर करणार आचारसंहिता भंगाचा गुन्हा? ; शिवसेनेच्या ज्योती वाघमारे यांना दिला हेमगड्डी यांनी हा सल्ला
सोलापूर : मोची समाजातील युवकांवर दाखल झालेल्या 353 चे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले, मुळात आचारसंहिता असताना, या केसेस कोर्टात चालू असताना एका समाजाची मते मिळण्यासाठी केलेला खटाटोप चुकीचा असून हा आचारसंहितेचा भंग झाला आहे त्यामुळे काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्षाशी चर्चा करून भाजप विरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती नूतन प्रदेश सरचिटणीस संजय हेमगड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मोची समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते करण म्हेत्रे यांच्या निधनानंतर कोरोनाच्या काळात युवकांची झुंबड उडाली होती, त्यावेळी त्या युवकांमध्ये आणि पोलीस प्रशासनामध्ये झटापट झाली. त्यामुळे सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी 353 चे गुन्हे दाखल झाले होते. त्या प्रकरणात आमदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोलून प्रयत्न केले, विधानसभेत ही आमदार प्रणिती शिंदे यांनी याप्रकरणी विषय मांडला होता, त्यामुळे भाजपने फुकटचे श्रेय घेऊ नये असे हेमगड्डी म्हणाले.
दरम्यान मोची समाजाच्या प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांना सल्ला देताना आमच्या समाजाच्या आपण मोठ्या राजकीय पदावर आहात, समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करून दाखवावे उगीच दिशाभूल करू नये.