ब्रेकिंग : काँग्रेसच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचे निधन
सोलापूर : ज्येष्ठ नेत्या तथा काँग्रेस पक्षाच्या माजी आमदार निर्मलाताई ठोकळे यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समय त्यांच्या वय 86 वर्ष होते.
निर्मलाताई ठोकळ्या दोन वेळा आमदार राहिले आहेत सुरुवातीला त्या नगरसेविका होत्या त्यानंतर 1972 ते 76 दरम्यान त्या जुन्या शहर दक्षिणमधून काँग्रेस पक्षातर्फे विधानसभेवर निवडून आल्या नंतर त्यांचे भावजी ॲड बाबासाहेब भोसले हे 1982 मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा त्या राज्यपाल कोट्यातून आमदार म्हणून विधान परिषदेवर गेल्या होत्या.
त्यानंतर त्यांनी सोलापूर शहराच्या राजकारणात आपला कायम सहभाग नोंदवला काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत.
दरम्यान वृद्धापकाळाने बरेच दिवस त्या राजकारणापासून दूर दिसून आल्या. मंगळवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील निराळे वस्ती कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तोरणा बंगला या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी असून सायंकाळी पाच वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.