सोलापुरातील ग्रामीण पोलिसांच्या सीएनजी पंपावर मोठा अनर्थ होता होता टळला. कर्मचाऱ्यांची निष्काळजी आणि ग्राहकाच्या गडबडीमुळे मोठं नुकसान होता होता वाचलं. कर्मचारी सीएनजीचा पाईप गाडीला लावून दुसरीकडे गेला सीएनजी भरल्यानंतर लगेच कर्मचाऱ्याने पाईप काढायला हवा होता परंतु तो त्याने काढला नाही गाडी ड्रॉइव्हरच्या देखील हे लक्षात आले नाही त्याने पंपाच्या पाइपसकट गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न केला एवढं होत असताना देखील कोणताही कर्मचारी पाईप काढण्यासाठी किंवा गाडी थांबवण्यासाठी पुढे आला नाही परिणामी मोठा आवाज होऊन सिएनजीचा पाईप पंपापासून वेगळा झाला…पहा हा व्हिडीओ….


















